संगमेश्वर:- या वर्षी देखील बॉम्बे आर्ट सोसायटी संस्थेनी अनेक वर्षांची परंपरा अबाधित राखत चित्र -शिल्प स्पर्धा घेतली.या मध्ये ऑनलाईन कलाकृतीचे फोटो पाठवले गेले व त्यातून संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांची निवड केली गेली . अनेक कलाविद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते . या मधून निवड होणे त्या विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. अशातच कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी प्रथमेश गोंधळी याला बॉम्बे आर्ट सोसायटीचा मानाचा समजला जाणारा स्व. गोविंदरावजी निकम पुरस्कृत बेस्ट स्कल्पचर अवॉर्ड घोषित झाला आहे. त्यामुळे कलामहाविद्यालयाचे व सह्याद्री शिक्षण संस्थेचे नाव उंचावले आहे.
विद्यार्थी आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास देत आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्याचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम,अनिरुद्ध निकम कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन केले.