रत्नागिरी:- येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माहेर संस्थेच्या परिसरातील व समर्थ नगर येथील रस्त्यावर पडलेला पालापाचोळा, प्लास्टिक, कागद इत्यादी कचरा संस्थेतील प्रवेशित्ताने एकत्र केला व एकत्र केलेल्या कचऱ्याची पूजा अर्चा करत होळीचे दहन केले. या सणाच्या निमित्ताने माहेर संस्थेने स्वच्छतेचा संदेश दिला. या निमित्ताने माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी असे मत व्यक्त केले की, होळी या सणात जिवंत झाडाची होणारी कत्तल टाळून सुक्या लाकडांचा वापर होणे गरजेचे आहे. होळी दहनासाठी संस्थेतील निराधार महिला, पुरुष, मुले, मुली व कर्मचारी उपस्थित होते.