विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कौतुकास्पद : डॉ. अजीज पठाण
रत्नागिरी : “विद्यार्थ्यानी यश मिळवण्यासाठी अनेक स्वप्ने पहावीत. ही पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवणे हा तर खरा मानवी मनाचा धर्मच आहे. कठोर मेहनत, प्रयत्न आणि सुसंवाद यांनी आपण यश खेचून आणू शकतो. आणि हेच गुण विद्यार्थ्याना यशाच्या शिखराकडे घेऊन जातात. तर यश हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे समजून घ्यावे, आणि हे यश मिळवण्यासाठी प्रयत्नाची कास धारावी”, हा मोलाचा संदेश संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ चे माजी प्राचार्य डॉ. अजीज पठाण यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी च्या वार्षिक स्नेहसंमेलन ’उमंग’ च्या पारितोषिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ०८ मार्च ते ११ मार्च २०२५ या कालावधीत मत्स्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ चे माजी प्राचार्य डॉ. अजीज पठाण, तर विशेष अतिथी म्हणून मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व भारतीय स्टेट बँक, सांगलीचे व्यवस्थापक श्री. प्रमोद रणदिवे तर अध्यक्षस्थानी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी चे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी आपल्या प्रस्ताविकात विदयार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण यांनी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पार पडलेल्या विविध क्रीडा – सांस्कृतिक स्पर्धांची माहिती तसेच कार्यक्रमाला ऋषितुल्य लाभलेले पाहुणे डॉ. पठाण, श्री.रणदिवे, डॉ. कोवळे यांची ओळख उपस्थित विद्यार्थ्याना करून दिली. डॉ. शेखर कोवळे यांनी मत्स्य महाविद्यालयाने राबवलेले विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम आणि त्यासाठी वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान तसेच कार्यक्रमातून पाहिलेल्या शिक्षक-विद्यार्थी नात्याबद्दल गौरवोदगार काढले. मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच सध्या भारतीय स्टेट बँक, सांगली येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले श्री. प्रमोद रणदिवे यांनी सांघिक खेळाचे महत्व, संघटन याबद्दल स्वाअनुभव विशद करून मत्स्य महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे व विजेत्या संघांचे विशेष कौतुक केले.
’उमंग’ २०२५ हे स्नेह संमेलन पार पाडण्यासाठी डॉ. बाळासाहेब कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे व शिक्षण संचालक डॉ. सतिष नारखेडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमात पहिल्या दिवशी दोन अंकी नाटक “पाहुणा ”, दुसऱ्या दिवशी संगीतरजनी तथा वाद्यवृंद आणि तसेच तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
काही निवडक स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे: गोळा फेक (मुले): प्रथम प्रतीक यादव, द्वितीय ए.मॅथीवनंन; गोळा फेक (मुली): प्रथम प्रतीक्षा निंबार्ते, द्वितीय प्राजक्ता राजगे, थाळी फेक (मुले): प्रथम ए.मॅथीवनंन, द्वितीय प्रतीक यादव ; थाळी फेक (मुली):प्रथम प्राजक्ता राजगे, द्वितीय लक्षिता कोळी. बुद्धीबळ (मुले): प्रथम ए.मॅथीवनंन, द्वितीय साईनाथ गावकर; बुद्धीबळ (मुली): प्रथम शमिता निनावे, द्वितीय साक्षी सामंत. कॅरम (मुले): रोहित बांगे, द्वितीय स्वराज पाटील. कॅरम (मुली): प्रथम प्रियंका आर., द्वितीय लक्षिता कोळी. बॅडमिंटन (मुले): प्रथम रोहित सावंत, द्वितीय सागर कीर्तिकर; बॅडमिंटन (मुली): प्रथम ऐश्वर्या भालेकर, द्वितीय चैताली इन्सुलकर. टेबल टेनिस (मुले): ए.मॅथीवनंन, द्वितीय ताहा होडेकर, टेबल टेनिस (मुली): प्रथम मोनाली कोकाटे, द्वितीय गौरांगी जोशी. पारितोषिक वितरण समारंभामध्ये यावर्षीची जनरल चॅम्पियनशिप पदव्युत्तर-आचार्य पदवीचे विद्यार्थी यांनी जिंकली. महाविद्यालयाचे वार्षिक पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे: राष्ट्रीय सेवा योजना बेस्ट स्टुडन्ट – कुणाल पिंगट; बेस्ट लायब्ररी यूजर – विद्या थोरात, ए.मॅथीवनंन; बेस्ट कल्चरल स्टुडन्ट – शिवानी काटे, मैथिली पारधी; बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर – मोहित कोळी यांना देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थी परिषदेचे सचिव नईफ जमादार यांनी चालू शैक्षणिक वर्षाचे उपक्रम विशद केले. कार्यक्रमाचे आभार उपसचिव पूर्वा आडीवरेकर हिने उपस्थिकेले. या स्नेहसंमेलनासाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.