खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवली-वासाडा येथील जंगलमय भागात आंबवली ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना पाण्याच्या टाकीजवळ ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष लक्ष्मण आखाडे (रा. आंबवली महादेवनगर, खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. जंगलमय भागात मोकळ्या जागेत तो उजव्या कुशीवर मृतावस्थेत आढळून आला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.