रत्नागिरी:- शिमगोत्सव सण असल्याने केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या वृद्धाला लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली. यामध्ये तो जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १ वा. सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुंडलिक ज्ञानदेव पाटील (६०) हे आपल्या मजुरीचे पैसे श्रीकांत सावंत यांच्याकडे मागण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली. तसेच हाता खांद्यालाही मार लागल्याने जखमी झालेल्या पुंडलिक पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली असून घटनेची पाहणी एपीआय पाटील यांनी केली आहे.