चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील कुशिवडे गावामधील सामाजिक कार्यकर्ते, सत्यशोधक प्रवर्तक विलास डिके व त्यांचे वडील निसर्गवासी भागोजी बुधाजी डिके यांचे वृद्धापकाळाने दि. २५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांचे अत्यंसंस्कार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणतेही कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले. म्हणजेच दोन्ही मुलांनी आपल्या आईचे सौभाग्य अलंकार उतरवू दिले नाही व दोन्ही मुलांनी डोक्यावरचे केस काढले नाहीत. त्यानंतर पुढचे कोणतेच सातवे, बारावे कार्य न करता अनिष्ट कर्मकांडाला तिलांजली देत एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून या परिवर्तनाची चर्चा होताना दिसते.
निसर्गवासी भागोजी बुधाजी डिके यांचे सत्यशोधक पध्दतीने मरणोत्तर कार्य रविवार, दि. ९ मार्च रोजी फोटो पुजनाने झाले. हे सत्यशोधक मरणोत्तर कार्य संस्कारकर्ते, सत्यशोधक प्रवर्तक, प्रबोधनकार, कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या मरणोत्तर संस्कारानंतर त्यांच्या नावाने पाच झाडे लावण्यात आली. तसेच शोकसभा घेऊन आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेला कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोयशी, सामाजिक कार्यकर्ते तानू आंबेकर, एमएससीबी ऑफिसर अशोक काजरोळकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रामचंद्र पालकर, कुशिवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कदम, बीएमसीचे वरिष्ठ लिपीक प्रकाश मालप, कुणबी शिक्षक विचारमंचाचे अध्यक्ष अनंत शिगवण, रत्नागिरी जिल्हा सत्यशोधक समाज संघाचे सत्यशोधक प्रदिप कांबळे (मंडणगड), सत्यशोधक महेंद्र जालगावकर(दापोली), सत्यशोधक रमेश बोरकर (खेड), सत्यशोधक कृष्णा कोकमकर, सत्यशोधक श्री. वायकर (खेड), सत्यशोधक प्रवर्तक चेतन नाईक(वाझोळे), सत्यशोधक प्रवर्तक गणपत भायजे ( चोरवणे), सत्यशोधक धनश्याम घडशी(सावर्डे), सत्यशोधक देवा उदेग(सावर्डे), सत्यशोधक रमेश जिनगरे (चिपळूण), सत्यशोधक मा. साहिल बागवे ( जलसंपदा विभाग देवरुख), सत्यशोधक प्रवर्तक मिलिंद कडवईकर, सत्यशोधक प्रवर्तक संदिप येलये, सत्यशोधक अशोक भाटकर (रत्नागिरी), सत्यशोधक सिद्धार्थ जाधव, सत्यशोधक संदेश सावंत, शिक्षक मित्र प्रतिष्ठान सावर्डेचे दशरथ बांबाडे, रविंद्र शिवडे (सावर्डे), राजेश मोहिते (सावर्डे) राजेश पवार (सावर्डे), प्रदिप जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शोकसभेत आदरांजली वाहताना सामाजिक कार्यकर्ते तानू आंबेकर बोलले की, गावात बदल करणे सोपे नाही. आज लोक कर्मकांडालाच धर्म समजायला लागलेत. डिकेंच्या आईने कोणतेही अलंकार व कुंकू न पुसता कृतीतून परिवर्तन करून दाखविले. या वैचारिक परिवर्तनाला माझा सलाम. कर्मकांडातून बाहेर कसे पडावे व जन्म-मृत्यू हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. जूनाट बुरसट विचारांना यावेळी तिलांजली देण्यात आली. काळानुसार आपण बदललं पाहिजे. नवीन पिढी समोर नवा आदर्श घालून देत कर्मकांडातून मुक्त समाज निर्माण करण्याचे तसेच भयमुक्त समाज घडविण्याचा विचार कृतीतून परिवर्तन केले आहे. या शोकसभेचे सुत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले.