रत्नागिरी (प्रतिनिधी) : संत निरंकारी सत्संग भवन भोके फाटा निवळी येथे सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त व महिला दिनाचे औचित्य साधून सद्गुरू माताजींच्या कृपाशीर्वादाने रविवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात डॉ. प्रेमा ओबेरॉय यांनी मोफत नेत्र तपासणी या शिबिराचे आयोजन केले.
ग्रामीण भागामध्ये नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन होत नाही, तरी सद्गुरु माताजींच्या कृपेने रत्नागिरी भवन येथे आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये सुमारे २०९ नेत्र तपासणी पैकी मोतीबिंदू साठी 33 चस्मा साठी 82 इतक्या महात्मा माता-भगिनींनी व इतर ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला. यामध्ये डोळ्यांची मोफत तपासणी करून त्यांना चष्मा देण्याची सुविधा तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करून देण्याची सुविधा करण्यात आली. संत निरंकारी मंडळ रत्नागिरी शाखेचे संयोजक तथा ज्ञान प्रचारक महात्मा रमाकांत खांबे तसेच सेवादल संचालक महात्मा बाबाजी नवेले यांनी या शिबिराचे नियोजन केले. डोळ्यांना होणाऱ्या आजारांचा बाबतीत ग्रामीण भागामध्ये दुर्लक्ष केले जाते व त्यासाठी सदर भागातील ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन झालेच पाहिजे अशी इच्छा आदरणीय प्रेमा ओबेरॉय जी, झोनल प्रमुख प्रकाश म्हात्रे जी, संयोजक रमाकांत खांबे जी, संचालक बाबाजी नवेले व इतर महात्माजींनी व्यक्त केली.