देवरुख:-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान देवरूख विभागातर्फे साडवली येथील बने स्कूलच्या मैदानात २४ मार्चला सायंकाळी ५.३० वा. धर्मवीर बलिदान दिन या विषयावर संभाजी भिडे गुरूजी यांचे व्याख्यान होणार आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या सहवासाने पावन झालेल्या संगमेश्वर धर्मभूमीमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराजांचा इतिहास व त्यांचे बलिदान यामुळे जिवंत असलेल्या हिंदुस्थानचे वास्तव अनुभवण्यासाठी व धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी हिंदू बंधू-भगिनींनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश गायकवाड, श्रीधन बाळेकुंद्री यांनी केले आहे.