दापोली:- तालुक्यातील मुरुडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरुडमधील अवघ्या पंधरा वर्षीय मुलींने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरुड येथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलींने आपल्या घरी ओढणीच्या सहाय्याने घरातील वाशाला टांगून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 12 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली .
मुलीने गळफास लावून घेतलेला लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने दीराला बोलवून दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे तिला दाखल केलं. मात्र वैद्यकीय तपासणी नंतर दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी त्या मुलीला मृत घोषित करण्यात आले.
याबाबतची लेखी तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली असून मुलीच्या नातेवाईकांनी या घटनेचा अधिक तपास करण्याची आग्रही विनंती केली आहे.
मात्र मुलीने आत्महत्या का केली याबाबतची माहिती कळू शकली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.