रत्नागिरी:- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी निवळी येथील रिसॉर्ट डीओ रीगलो ला इंडस्ट्रियल भेट दिली.
या भेटीमध्ये कौशल्य विकास केंद्रातील फ़ूड एंड बेवरेज सर्विस असोसिएट आणि कॉमिज शेफ या बॅच मधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या शिक्षक वर्गाने व रिसॉर्ट स्टाफ ने विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखवून विस्तृत महिती दिली.
या वेळी रिसोर्ट डीओ रिगालो च्या प्रत्येक विभागाच्या स्टाफने रिसेप्शन-फ्रंट ऑफिस, रेस्टॉरंट, बैंक्वेट , रूम सर्विस या विभागांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालते याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह महिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना आजच्या भेटीमध्ये या क्षेत्रातील नवनवीन माहिती अनुभवायला मिळाली याबद्दल रिसॉर्ट डीओ रीगालो व कौशल्य विकास केंद्र यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रिसोर्ट डीओ रीगालो चे मॅनेजर संजय पाल सर व फ्रंट ऑफिस मैनेजर विक्रम चौधरी सर यांनी विशेष सहकार्य केले. कौशल्य विकास केंद्राचे प्लेसमेंट हेड श्री गौतम कहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या इंडस्ट्रियल भेटीमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधींची माहिती होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आणि हॉटेल व्यवस्थापनाचे आभार मानले.
या प्रसंगी सर्व विद्यार्थी, डीओ रिगालो रिसॉर्ट मधील सर्व कर्मचारी, कौशल्य विकास केंद्राचे प्लेसमेंट हेड श्री गौतम कहाळे शिक्षकवर्ग श्री अमेय मुळ्ये,श्री ऋत्वेज शिरधंकर सहकारी श्री तुषार सुवारे व डी जे सामंत कॉलेज च्या प्राध्यापिका सौ प्रज्ञा तांबे आदी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी रिसोर्ट डीओ रीगालो चे मालक श्री सुमित म्हाप व कौशल्य विकास केंद्राचे डीन श्री निखिल शुक्ला, सेंटर हेड श्री सूरज जाधव , डी जे सामंत कॉलेज पाली च्या प्राचार्या सौ कांता कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.