खेडः तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १८ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत आरोग्य सेवा शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात ०-१८ वयोगटातील विविध आजारांनीग्रस्त बालकांवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी व उपचार तसेच आवश्यक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
अंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लबमार्फत मोफत प्रोटीन पावडर, टॉनिक तसेच अन्य औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.