रत्नागिरी:- ४ मार्च पासून रत्नागिरी जिल्हयात शिमगोत्सवास सुरुवात झालेली आहे. कोकणात शिमगोत्सवाचे फार मोठे महत्व आहे. नोकरी व्यवसायाकरीता मुंबई-पुणे किंवा इतर ठिकाणी असलेले नागरीक शिमगोत्सवाकरीता कोकणात मोठ्या प्रमाणावर येत असतात. शिमगोत्सवात पालखीच्या मानपानावरुन, पुजेवरुन ठिकठिकाणी वाद असतात.
धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच श्रीमती जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सुचनांनुसार शिमगोत्सवात वादात्मक परिस्थिती असलेल्या गावांची संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी माहिती घेऊन तेथे शांतता समितीच्या बैठका तसेच गावभेट घेऊन तेथील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला तसेच सण शांततेत पार पाडणेबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे संबधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे अथक प्रयत्नांमुळे खालील १९ वादात्मक परिस्थिती असलेल्या गावांमध्ये एकोपा निर्माण होऊन शिमगोत्सव शांततेत पार पडणार आहे. तसेच अदद्यापही अनेक गावात एकोप्याने सण साजरा करणेकरीता शांतता कमिटी मिटींग घेणेबाबत प्रयत्नरत आहेत.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी उपरोक्त वाद मिटलेल्या गावांतील ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. जिल्हयातील सर्व नागरीकांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करुन शिमगोत्सव शांततेत पार पाडणेकरीता जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन केलेले आहे.