दहशतवाद विरोधी शाखा, रत्नागिरीची कारवाई
रत्नागिरी:- अलिकडच्या काळात महाराष्ट्रात बांग्लादेशी नागरीक भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करुन वास्तव्य करीत असलेबाबत निर्दशनास आलेले आहे. शासनाकडुन तसेच वरिष्ठांकडुन बांग्लादेशी नागरीकांवर कारवाई करणेबाबत सुचित करण्यात आलेले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, यांनी बेकायदेशीरपणे रत्नागिरी जिल्हयात वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरीकांची गोपनीय माहिती घेऊन त्यांचेवर कारवाई करणेबाबत दहशतवाद विरोधी शाखेस सुचना दिलेल्या होत्या.
दहशतवाद विरोधी शाखेस गोपनीय बातमीदारांमार्फत खेड पोलीस ठाणे हद्दित कळंबणी आपेडे फाटा येथील सुरु असलेल्या बांधकाम इमारतीमध्ये बांग्लादेशी नागरीक बेकायदेशीर पणे वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्याने दिनांक 11/03/2025 रोजी घटनास्थळी जाऊन तेथील कामगारांकडे खात्री केली असता, एक बांग्लादेशी नागरीक अकबर अबु शेख, वय 65 वर्षे, रा. पेडोली, तहसिल चौदुलपुर, ठाणा अभयनगर, जिल्हा जेशुर, राज्य ढाका देश बांग्लादेश हा मिळुन आल्याने त्याचेविरुध्द खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास अटक करण्यात आली असून त्याची 4 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेवून पुढील तपास करण्यात येत आहे.
सदर कामगिरी दहशतवाद विरोधी शाखेतील पोहेकॉ महेश गुरव, पोहेकॉ/आशिष शेलार, पोहेकॉ योगेश तेंडुलकर, पोना / रत्नकांत शिंदे व पोकों/गोवर्धन राठोड यांनी केलेली आहे.