राजापूर:- राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक संजय ओगले यांची तर उपाध्यक्षपदी विजय पाध्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचे बँकेचे संचालक मंडळ, बँक व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग आणि सभासद वर्गातून अभिनंदन करताना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.
यापूर्वी राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा अनामिका जाधव आणि उपाध्यक्ष विवेक गादीकर यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ समाप्त झाल्याने राजीनामे सादर केले होते. त्यानंतर राजापूर अर्बन बँकेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणुक झाली. बँकेवर सहकार पॅनेलची मागील अनेक वर्षे सत्ता असून यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे उपस्थित होते.