खेड : विक्री करण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारु स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एकावर कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी आवाशी-गणेशनगर येथे करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत कृष्णा साळवी (३९, रा. आवाशी-गणेशनगर, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.