चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मुंबई मटका जुगार अड्ड्यावर अलोरे-शिरगांव पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम व साहित्य असा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रमोद कांबळे (३०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबती फिर्याद अलोरे-शिरगांव पोलीस स्थानकातील पोलीस कॉन्स्टेबल दिलीप जानकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत हा अलोरे मच्छीमार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गैरकायदा, विनापरवाना मुंबई मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून आढळून आला. याच्याकडून ४५० रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्यासह एकूण ४९५ रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.