चिपळूण : तालुक्यातील सावर्डे बाजारपेठ येथील सर्व्हिस रोडवर चारचाकी मॅक्स गाडी उभी करून ठेवणाऱ्या चालकावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र राजाराम मोहिते (४०, कोसबी) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस शिपाई अजय कडू यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कडू हे सावर्डे पोलीस स्थानक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रविंद्र मोहिते याने आपल्या ताब्यातील चारचाकी मॅक्स गाडी सावर्डे बाजारपेठ येथील सर्व्हिस रोडवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होईल व पादचारी यांच्या जीवितास धोका होईल, अशी उभी करून अन्य ठिकाणी निघून गेला होता.