सिंधुदुर्ग : भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालय – वसंतस्मृती येथे जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन वहाळकर ( प्रदेश का.का.सदस्य – रत्नागिरी ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळेस व्यासपीठावर महीला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगावकर , जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी , सरचिटणीस संदिप साटम , विधानसभा प्रमुख मनोज रावराणे , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई उपस्थित होते .
यावेळेस जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन वहाळकर यांनी पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची माहीती दिली . तसेच प्रत्येक मंडलातील बैठकीचे वेळापत्रक बनविण्यात आले . यावेळेस १४ ही मंडलाचे अध्यक्ष तसेच निवडणूक प्रभारी , तसेच ता.सरचिटणीस व पदाधिकारी उपस्थित होते .