रत्नागिरी ः शहराजवळील शिरगाव-आडी येथे आंबा काजूच्या बागेत काजूच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या नेपाळी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास तपासून मृत घोषित केले. भिमबहाद्दुर बम (वय ३५, रा. साडेपाणी, कैलाली-नेपाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिमबहाद्दूर बम हे आडी येथील आंबा काजूच्या बागेत बेशुद्ध अवस्थेत आढळले. खबर देणार यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.