रत्नागिरी : जिल्ह्यात लोकनेते शामराव पेजे यांच्यानंतर नंदकुमार मोहिते यांच्या रूपाने एक सामाजिक नेतृत्व उद्यास आले होते मात्र त्यांच्या निधनामुळे कुणबी समाजाचे नेतृत्वच हरपल. असं नामदार उदय सामंत यांनी शोक व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, मोहिते साहेबांच निधन झालं ती बातमी मला समजली मात्र मी अधिवेशन मध्ये असल्यामुळे मला अंतयात्रेत सहभागी होता आलं नाही. लोकनेते अण्णासाहेब पेजे यांच्यानंतर समाजातील जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लावण्यासाठी नंदकुमार मोहिते यांचा सिंहाचा वाटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर झालेल्या बैठकीत नंदकुमार मोहिते यांनी अभ्यासपूर्वक बेदखल कुळांचा विषय मांडून सोडवणूक करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नशील होते. तिलोरी कुणबी यांना जात पडताळणीसाठी अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं तो विषय देखील आमच्यासमोर नंदकुमार मोहिते यांनी मांडून त्याची सोडवणूक करून घेतली. समाजातील एक निस्वार्थी, प्रामाणिक नेतृत्व म्हणजे नंदकुमार मोहिते होते.
ते जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी आपली जिल्हा परिषदेमध्ये चांगली छाप पाडली होती. ज्या ज्या ठिकाणी समाजाला न्याय देता येईल तेवढा आटोकाट प्रयत्न त्यांनी केल्याचे आपण पाहिले आहे. येथील उजाड माळरानावर त्यानी लोकनेते शामराव पेजेंच्या नावाने ज्युनिअर , सीनिअर कॉलेज सुरू करून हे शैक्षणिक संकुल उभारले आहे. एखाद कॉलेज सुरू करणे ते चालवणे ही सामान्य बाब नाही. म्हणून त्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यास आपण कटिबद्ध आहोत. असे मत शोक सभेत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयात ही सभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत समाज नेते सुरेश भायजे, श्री. तानाजी कुळये,सौ साक्षी रावणंग ,संस्थेचे सचिव श्री.थूळसर,शिवश्री प्रवीण कोळपटे(पत्रकार), ऍड.महेंद्र मांडवकर,राजीव कीर ,अशोक भाटकर, बी.टी. झोरे, सुहास शंकर आंब्रे, शांताराम खापरे, यशवंत डोर्लेकर, प्रशांत किर, सुहास वाडेकर, राजन रोकडे, ऍड. अनघा बोले, तनुजा मेस्त्री ,दीक्षा कुड यांनी शोक व्यक्त केला.
यावेळी नंदकुमार मोहिते यांचे बंधू दयानंद मोहिते, सुनील नावले,दयानंद लाखन, अर्जुन कदम आदि उपस्थित होते.
ना. उदय सामंत यांनी नंदकुमार मोहिते यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी व मुलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.