रत्नागिरी:– कोतवडे येथे उमेद बचतगट अंतर्गत मंगलमूर्ती ग्रामसंघ आणि चैतन्य ग्रामसंघातील महिलांनी आगळावेगळा महिला दिन साजरा केला. या वेळी २०० महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
महिलांचे मानसिक विकार आणि त्यावर उपाय याबद्दल मार्गदर्शन कोतवडे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी केले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती मयेकर, तलाठी अपूर्वा मयेकर, पायल पांचाळ, पूर्वा बारगोडे, पोलिस पाटील माने उपस्थित होत्या. व्यवसाय करून अर्थार्जन करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी फनी गेम्स, गाणी यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले. चैतन्य ग्रामसंघाच्या अध्यक्ष दिया कांबळे, नीता ठोंबरे, सुरभी शितप, समृद्धी सोनार, मंगलमूर्ती अध्यक्ष वासंती महाडिक, विजया कोलगे आणि पूजा मांडवकर, स्मिता पवार यांनी कार्यक्रम उत्तम होण्यासाठी मेहनत घेतली.