राजापूर:- रत्नागिरी जिल्हा चेस असोसिएशनच्या मान्यतेने आणि सेन्टेनरी चेस क्लब गोवाच्या सहयोगाने, राजापूर रॉयल चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री चषक या भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धे गोव्यातील मंदार प्रदीप लाड याने खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
शहरातील श्री मंगल कार्यालय गुजराली राजापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ बुद्धिबळ राजापुरातील उद्योजक श्री प्रकाश कातकर यांच्या हस्ते आणि नगरसेविका शितल पटेल, निलेश रहाटे, रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव विवेक सोहनी सर, विकास कुंभार सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
राजापूरचे तहसीलदार श्री गमरे साहेब यांनी स्पर्धे च्या ठिकाणी भेट देऊन आयोजकांना व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा स्विस लिग पद्धतीने खेळवण्यात आली. स्पर्धेचा उपविजेता कोल्हापूर येथील श्रीराज भोसले ठरला. चिपळूणच्या साहस नारकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रत्नागिरी येथील वरद पेठे यांने चतुर्थ तसेच कोल्हापुरातील प्रशांत पिसे याने पाचवा क्रमांक पटकावला.
सर्वोत्तम ज्येष्ठ खेळाडूचा मान विवेक जोशी यांना मिळाला तर सर्वोत्तम राजापूर खेळाडू मृणाल विकास कुंभार ठरली.
खुल्या गटातील इतर क्रमांक यश गोगटे,रत्नागिरी,गवस रीशीत, गोवा,वाळिंबे जितेंद्र, पुणे,भोसले हेमंत, कोल्हापूर,परब ऋषिकेश, गोवा,शिरधनकर सुभाष, रत्नागिरी,तवटे वरद, कणकवली,आयुष रायकर, रत्नागिरी,रूमडे सोहम, रत्नागिरी,निधी मुळये, रत्नागिरी,साहिल बावधने,यथार्थ डांगी,रऊल विभव,अर्णव चव्हाण,आंबेकर रवी, कोल्हापूर,
या स्पर्धेतील वयोगटानुसार विजेते खालील प्रमाणेवयोगट 15 वर्षे मुलगे
यश पवार कणकवली,धुळप आर्यन,डोईफोडे वेद
वयोगट 15 वर्षे मुली
1. आडेलकर तनिष्का
2. सई प्रभूदेसाई
3. रामदुरकर साक्षी
वयोगट १३ वर्षे मुलगे
१. रुद्र मोबारकर
२. शुबाण बांदोडकर
3. चिदानंद रेडकर
वयोगट १३ वर्षे मुली
१. हुम्बे निर्झरा
२. आर्या पळसुळेदेसाई
3. गार्गी किरण सावंत
वयोगट ११ वर्षे मुलगे
1. यश प्रवीण सावंत
2. गावडे समर्थ
3. निल दिनेश कुडाळी
वयोगट ११ वर्षे मुली
१. श्रीया बांदोडकर
2. मृण्मयी दांडेकर
3. अनन्या पारकर
वयोगट ९ वर्षे मुलगे
१. विहांग अक्षय सावंत
२. विहान राहुल अस्पतवार
3. पारस विलास मुंडेकर
वयोगट ९ वर्षे मुली
1. राही मोबारकर
वयोगट 7 वर्षे मुलगे
1. आरव ओमकार निमकर
स्पर्धेचे बक्षीस वितरण राजापूरचे माजी नगराध्यक्ष श्री. हनीफ काजी, नगरसेविका शितल पटेल, समाजसेवक श्री मजीद पन्हळेकर, अमृत तांबडे, एजाज बांगी यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून तनिष्क कुवळेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजापूर रॉयल चेस अकॅडमी मोहसीन सय्यद, आणि अमृत तांबडे यांनी मेहनत घेतली.