रत्नागिरी ः शहरातील एमआयडीसी येथे रस्त्याच्याकडेला लाईटच्या पोलखाली दुचाकी उभीकरुन पत्नीशी बोलणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अमित सुभाष सागवेकर असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला सांयकाळी साडेसातच्या सुमारास एमआयडीसी लायन्स क्लबच्या समोर रस्त्याच्या कडेला लाईटच्या पोलखाली घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नरेंद्र धर्मा साळुंखे (वय ३८) हे एमआडीसी येथील रस्त्याच्याकडेला पोलखाली दुचाकी (क्र. एमएच-०८ ई ९१२५) पार्क करुन पत्नीशी बोलत असताना दुचाकी (क्र. एमएच ४६ एक्स १९६६) वरिल संशयित चालक अमित सागवेकर याने धडक दिली. या अपघातात फिर्यादी साळुंखे व त्यांची पत्नी सौ.आरती साळुखे दुखापत झाली. दुचाकीचे नुकसान झाले. तसेच संशयित अपघात करुन पळून गेला. या प्रकरणी नरेंद्र साळुंखे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.