रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेची बॅग चोरट्याने पळविली. त्यामध्ये रोख रक्कम ३५ हजार व ४ हजाराची हॅण्ड बॅग असा ३९ हजाराचा मुद्देमाल होता. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ फेब्रुवारी पहाटे तीन ते पाच या वेळात रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवासी महिलाही राजधानी एक्स्प्रेसमधून दिल्ली ते गोवा असा प्रवास करत असताना त्यांच्या रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान झोपेचे फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील बॅग पळविली. त्यामध्ये ३५ हजार रोख व ४ हजाराची बॅग असा ३९ हजाराचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी महिले शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.