तुषार पाचलकर/राजापूर:-राजापूर तालुका दौऱ्यावर आलेले, आणि सद्या राजापूर, लांजा, साखरपा मतदार संघात अनेक विकासकामांचा धडाका लावणारे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांची पाचल व्यापारी संघटनेचे तसेच राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष आण्णा पाथरे यांनी भेट घेतली. पाचल परिसरातील नेटवर्क प्रश्न,पाचल परिसरातील एस टी महामंडळाच्या गाड्यांचे नियोजन,पाचल मधील विकास कामे,पाचल मधील रस्ता रुंदीकरण अशा अनेक विषयांवर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी आमदार किरण सामंत यांनी त्यांच्या अनेक विकासकामांची दखल घेत लवकरच या अडचणी आणि प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे उपस्थित होते.