खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जुन्या जगबुडी पुलावर शनिवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास प्रौढाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. भरत कदम (रा. नांदिवली) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
दारुच्या नशेत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या बाबत पोलिसांकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे.
जुन्या जगबुडी पुलानजीक रस्ता डांबरीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनशेजारी एका व्यक्तीचा मृतदेह तेथून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आला.
खिशातील कागदपत्रांवरून ओळख
ही बाब येथील पोलीस ठाण्यामध्ये कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून ओळख पटल्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. या बाबतचा अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.