रत्नागिरी : गावखडी ग्रामपंचायत व शाश्वत महिला ग्रामसंघ आणि मैत्री महिला ग्रामसंघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक 8 मार्च दिन संपन्न झाला .
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत शाश्वत महिला ग्रामसंघ गावखडी व मैत्री ग्रामसंघ ग्रामपंचायत गावखडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व PRI CBO कृतीसंगम उपक्रम अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आरोग्य शिबिर पावस उपकेंद्र मधुन डॉक्टर आशा वर्कर इत्यदि उपस्थित होते . डॉक्टर ने उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व जनरल आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमावेळी गाव चे सरपंच श्री पाटील सर , प्रमुख पाहुणे म्हणून DRP नुजहत नाकाडे मॅडम ,व ग्रामपंचायत सदस्य , पोलिस पाटील , तसेच मार्केटींग ची माहिती देण्याकरीत करीता एश्वर्या मॅडम उपस्थित होते . सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले . सरपंच सरांनी आपले मनोगत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमावेळी नाकाडे यांनी उपस्थित महिलांना विविध शासकीय योजना, व्यवसाय , PRI_CB0 project अंतर्गत कृत्रिमसंगम करून कसे काम करायचे ते सांगितले . त्याच प्रमाणे आरोग्य विषयक काळजी घेणे इ. विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जेंडर विषयी मार्गदर्शन केले. ग्रामसभा , बालसभा, शिबिर , साक्षरता विषयी उपस्थित महिलांना महिला सक्षमीकरण उपजीविका याविषयी मार्गदर्शन केले तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिलांनी सहभाग घेतला व सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला .