गुहागर:- तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने कोकण क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर खेतले, विशाल बेलवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे वार्षिक निरीक्षक अनुषंगाने पोलीस पाटील सागर रक्षक ग्रामरक्षक मच्छिमार सोसायटी सदस्य यांचा विशेष मेळावा गुहागर येथे आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र राजमाने, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या सह सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर खेतले, स्वप्निल बारगोडे, विशाल बेलवलकर, अरविंद पड्याळ, भक्ती गद्रे, अनिल घाडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश भाटकर, इरफान दळवी, अनुजा वाघे, स्वाती निमकर उपस्थित होते.