रत्नागिरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीतील मनसे कार्यालयाचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आला.
भाजी विक्रेत्या,भंगार गोळा करणा-या आणि सफाई कामगार महिला यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.हे कार्यालय सर्वसामान्य लोकांचे आहे,या कार्यालयातून सर्व सामान्य माणसाला नक्कीच न्याय मिळवून देवू असे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी सांगून या साठीच आम्ही या महिलांच्या हस्ते उद्घाटन केले आहे, भविष्यात सर्व सामान्य माणसाच्या येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.
या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून कष्टकरी महिला आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी मनसे रत्नागिरी चे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.