रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री येथे सुरुचे झाड कोसळल्याने महामार्ग अर्धा तास ठप्प झाला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. गेली अर्धा तास होऊन अधिक काळ वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री येथे दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास एक सरुचे झाड महामार्गावर मधोमध पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कंटेनरसह अनेक मोठ्या गाड्या या मार्गावर दोन्ही बाजूने अडकल्या आहेत. महामार्ग विभागाला या संदर्भात माहिती कळवून हे जवळपास अर्धा पाऊण तास झाला तरी यंत्रणा दाखल झालेली नाही त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून कोणतेही वाहन जाण्यास मार्ग नसल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत. छोटी वाहने उक्षी करबुडे मार्गाने रवाना झाली आहेत मात्र मोठी अवजड वाहने यामध्ये अडकली आहेत. त्याचबरोबर एसटी बस सुद्धा खोळंबली आहे.
आधीच रस्त्यांवरील उन्हाच्या वाफाने वाहन चालक हैराण झालेले असताना त्यातच या वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना बसला आहे.