आमदार किरण सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण
लांजा : लांजा आणि राजापूर आगारामध्ये एसटी बसची कमतरता असल्याने ती दूर करण्यासाठी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लांजा आगारासाठी उपलब्ध झालेल्या ३ नवीन एसटी बसचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला.
एसटी बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र ही गैरसोय आता दूर होणार असून आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने लांजा आगारसाठी तीन आणि राजापूरसाठी चार अशा सात एसटी बस जनतेच्या सेवेत रुजू झाल्या आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचार करत असताना ग्रामीण भागातील जनतेतून लालपरीच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती जात होती. अनेक ठिकाणी एसटी बस संदर्भात अडचणी समोर येत होत्या, तेव्हा आमदार किरण सामंत यांनी माहिती घेतली होती असता बसेसची कमतरता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी नवीन बसेस आणण्याचा प्रयत्न करेण असा शब्द आमदार सामंत यांनी दिला होता. तो दिलेला शब्द तंतोतंत पाळून आमदार किरण सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
लांजा आगारासाठी ३ नवीन एसटी बसचे आमदार किरण सामंत यांच्याहस्ते लोकार्पण
