दुखावलेल्या महिलेने मुलीचा खून करून घेतला बदला
रत्नागिरी: आईने शेजारणीला हिणवलेला वांझ हा शब्द जिव्हारी लागल्याने शेजारील महिलेने हीनवणाऱ्या महिलेच्या मुलीचा खून करून बदला घेतला. मात्र यात चार वर्षाच्या चिमुकलील जीव गमावावा लागला आहे. ही घटना गोवा येथे घडली. यातील पीडित महिला ही रत्नागिरीतील आहे. हा नरबळी नसून अमैराची आई अपत्यहीन पूजा हिला ‘वांझ वांझ’ म्हणून हिणवत होती. त्याचा बदला घेतला होता. मी जर वांझ तर तुलाही मी त्याच स्थितीत आणते, असा राग धरून तिने अमैराचा खून केला, अशी माहिती गुरुवारी (7 मार्च) पोलिसांनी दिली.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. संशयितांना अधिक तपासासाठी ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. पोलिस तपासात या बाबी उघड झाल्या असून, संशयितांना अधिक तपासासाठी ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी शुक्रवारी मडगावात पत्रकार परिषद घेऊन या खून प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक शिवराम वायंगणकर आणि पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर उपस्थित होते.
बाबासाहेब आल्हाट (वय ५३ वर्षे) याचे आई-वडील मूळचे औरंगाबाद (महाराष्ट्र) येथील आहेत. मात्र, त्याचा जन्म गोव्यातच झाला असून व्यवसायाने तो वेल्डर आहे. तर पूजा (वय ३९ वर्षे) ही मूळची सांगली येथील असून २०१० सालापासून हे दाम्पत्य गोव्यात राहात आहे. या जोडप्याला संतती नाही. बुधवार, ५ मार्च रोजी चिमुकली अमैरा ही घराबाहेर बागडत असताना तिला या दोघांनी चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. नंतर तिला पाण्याच्या टबमध्ये बुडवून ठार मारले. नरबळी किंवा संतती प्राप्तीसाठी हा खून झाल्याची शक्यता पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी नाकारली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता तपासकामाला सुरुवात केली.
पोलिस उपनिरीक्षक संदीप निंबाळकर, योगेश गावकर, बन्सल नाईक, सुशांत गावकर, हवालदार केदारनाथ जल्मी, पोलिस शिपाई शांतीलाल गावकर, शिवाजी चव्हाण, सतीश मांद्रेकर तसेच अन्य पोलिसांचे पथक बनवून तपासकामाला सुरुवात केली आणि त्वरित संशयितांना गजाआड करण्यात आले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. शवचिकित्सा अहवालात नाका-तोंडात पाणी गेल्याने अमैराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमैराला बाहेर कुठेतरी पुरून टाकण्याच्या प्रयत्नात ते दोघे होते. मात्र, तोपर्यंत ती बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार फोंडा पोलिस ठाण्यात नोंद झाल्याने पोलिस तपासासाठी त्या मुलीच्या घराजवळ आले. आपले बिंग फुटेल म्हणून संशयितांनी त्या चिमुरडीला घरातच खड्डा खोदून पुरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खुनाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आला. अमैरा पूजाच्या घरी जाताना दिसली; मात्र परत येताना दिसली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. त्यांना कायमची अद्दल घडली पाहिजे, अशी मागणी करत अमैराच्या आईने हंबरडा फोडला.
सुरुवातीला पूजाने अमैराला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले. त्यानंतर तिच्या नाका-तोंडावर हात ठेवून तिला गुदमरवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला घरात ठेवलेल्या पाण्याच्या टबमध्ये कोंबले. ती मृत झाली असल्याचे लक्षात आल्यावर तिला खड्डा काढून पुरले. कुणाला काही कळू नये म्हणून त्या खड्ड्यावर त्यांनी पाण्याचा टब ठेवला होता.
शवचिकित्सा झाल्यानंतर अमैराचा मृतदेह घरी आणला. पाण्यात बुडून, तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. लेकीचे निष्प्राण कलेवर पाहून अमैराच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अधीक्षक वर्मा यांनी सांगितले, पूजा आल्हाट आणि अमैराची आई यांच्यात संततीच्या कारणास्तव कडाक्याचे भांडण झाले होते. ती पूजाला नेहमी ‘वांझ’ म्हणून हिणवत होती. पूजाच्या मनात हा राग बरेच दिवस खदखदत होता. त्यामुळे ती पूर्वग्रहदूषित होती. त्याचा बदला घेताना तिने पती बाबासाहेब याच्या मदतीने त्या चिमुरडीला पळवून नेऊन तिचा कायमचाच काटा काढला.