रत्नागिरी -प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रामदेवता आई नवलादेवी पावस हिचे आगमन पूर्णगड किल्लेकरवाडी मध्ये घर भेटीला होणार आहे. तत्पूर्वी पावसाची नवलादेवी पावस येथून निघून ती मेर्वी गावात आगमन करणार आहे. त्यानंतर मेर्वीच नवलादेवी व पावसची नवलादेवी यांची अभूतपूर्व भेट सोहळा रंगणार आहे. ते झाल्यानंतर पावसची नवलादेव पालखी पूर्णगड किल्लेकर वाडीतील ग्रामस्थ आपल्या ताब्यात घेऊन ते वाजत गाजत मोठ्या आनंदाने व उत्साहाने ढोल ताशाच्या गजरात पूर्णगड किल्ल्यामध्ये आणणार आहे. त्यानंतर पूर्णगड किल्लेकरवाडीतील प्रत्येक घरामध्ये पावसची नवलादेवी भेट देणार असून यावेळी पूर्णगड किल्लेकर वाडीतील मुंबईकर मंडळी, नातेवाईक मंडळी, माहेरवासीन मोठ्या संख्येने प्रत्येक घरात येत असतात ही परंपरा पूर्वीपासून कित्येक वर्षे चालत आलेली आहे. यावेळी किल्लेेकर वाडीत मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण असते पावसच्या पालखीसोबत आलेल्या पावसच्या ग्रामस्थांना पूर्णगड किल्लेकर वाडीत भोजनाची व्यवस्था पूर्णगड किल्लेकरवडीतील महिला मंडळ तर्फे केली जाते. सदर पालखी पूर्णगड किल्लेकरकर वाडीतील घरभेटी पूर्ण झाल्यानंतर गावचे प्रतिष्ठित डॉ .श्रीराम फडके यांच्या घरी नैवेद्याकरता जाते त्यानंतर मोठ्या ढोल ताश्याने उत्साहाने व आनंदाने किल्लेेकर ग्रामस्थ पूर्णगड स्टॅंड वर पालखी पावस ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात येते.
पावसची नवलादेवी पूर्णगड किल्लेकर वाडीमध्ये आज घरभेटीला
