खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटानजीक दोन कारची धडक झाली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे चारजण जखमी झाले असून दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी 8 रोजी सकाळी घडली.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी 8 रोजी सकाळी मुंबई हून गोव्याच्या दिशेने जाणार्या वॅगनार कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून तिच्या पुढे चाललेल्या क्रेटा कारला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात वॅगनार कारमधून प्रवास करणारे चौघे प्रवासी (नावे समजू शकली नाहीत) जखमी झाले तर क्रेटा कारला मागून जोरदार धडक बसल्यानंतर त्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्ड्यात पडली. या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिक व वाहनचालक यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.