देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील देवरूख भोईवाडी येथे प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शशिकांत मनोहर वैद्य (५६) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत वैद्य हे देवरूख भोईवाडी येथे घरात एकटेच राहत होते. याचवेळी त्यांनी घरात गळफास घेवून आपले आयुष्य संपवले. या घटनेची खबर प्रदीप वैद्य यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व शशिकांत वैद्य यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात आणला. याठिकाणी डाँक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव करीत आहेत.