मंडणगड:- तलवारीने वार करून वीस वर्षीय तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तालुक्यातील म्हाप्रळ येथे गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. शुक्रवारी याबाबत मंडणगड पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्कर (रा. म्हाप्रळ) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी संशयित तंजीम मुकादमला ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ
येथील परेरा फार्म हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. तंजीम तौफिक मुकादम (रा. म्हाप्रळ) याने कोणतेही कारण नसताना आपल्या डोक्यावर, दोन्ही हातांच्या पंजावर तलवारीने वार केले आणि आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद अहमद मुंगरुस्कर याने दिली आहे. या फिर्यादीनुसार संशयित आरोपी तंजीम मुकादमवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.