चिपळूण- तालुक्यातील तिवरे गावच्या श्री वाघजाई मातेचा त्रैवार्षिक जत्रोत्सव सोहळा मिती फाल्गुन शु.दुवादशी शके १९४६ मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ सकाळी ९ वाजता पासून ते बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत साजरा होणारा आहे.
११ मार्च २०२५ रोजी सकाळी श्री वाघजाई मातेची विधिवत पूजा आणि अभिषेक,सकाळी १० वाजता देवीला रूपे लावणे,महाआरती व दर्शन सोहळा,
सायंकाळी ७ वाजता बाहेर गावावरून येणाऱ्या पालख्यांचे आगमन व स्वागत,
रात्री ९ वाजता श्री साधु आत्मा कासेगावकर कराड मांगले यांचा लोकनाट्य तमाशा,
रात्री ११ वाजता श्री वाघजाई मातेची पालखी रिंगणावर स्थानापन्न,
रात्री ११.३० ते ३ वाजेपर्यंत बाहेर गावावरून आलेल्या पालख्यांचे स्वागत व घाट धुपारती व छबिना,
१२ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता लाट चढविणे,सायंकाळी ५ वाजता आलेल्या पालख्यांचे विधीयुक्त पूजा करून सन्मानपूर्वक रवानगी असे कार्यक्रम होणार आहेत.
तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.