लांजा:- येथे तालुक्यातील बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या वतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण व सबलीकरण, उद्योग, रोजगार व विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. या यावेळी फाउंडेशनच्या सचिव अपूर्वा सामंत यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आर्थिक विकासासाठी हे फाउंडेशन भक्कम साथ देणार असल्याचे सांगितले. नीलम पालव यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लांजा तहसीलदार सौ. प्रियंका ढोले, कृषी अधिकारी श्री.संतोष म्हेत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सौ.साक्षी भुजबळराव, श्री.किशोर पवार (तालुका अभियान व्यवस्थापक एम.एस.आर.एल.एम)तालुकाप्रमुख श्री.गुरुप्रसाद देसाई, महिला जिल्हाप्रमुख सौ.शिल्पा सुर्वे, मा.सभापती सौ.मानसी आंबेकर, तालुकाप्रमुख महिला सौ.रसिका मिस्त्री, शहरप्रमुख सौ.कांचन बोडस,शहर प्रमुख श्री.सचिन डोंगरकर युवा सेना शहरप्रमुख श्री.प्रसाद भाईशेटे उपस्थित होते.