राजापूर : वाहतुकीस अडथळा होईल,अशा पद्धतीने रस्त्यावर गाडी लावल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील जवळेथर येथील शिवराम मोरे (५०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील ओणी कोल्हापूर मार्गावर पाचल बसस्थानक भागात त्यांनी वाहतुकीला अडथळा होईल, अशी गाडी लावली होती.