खेड :तालुक्यातील नांदगाव जाखलवाडी येथे बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दौलत सखाराम खोपटकर यांच्या घराला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले.
या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. यावेळी फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक विद्याधन पवार, सहायक फायरमन जयेश पवार तसेच प्रणव रसाळ आणि प्रणय घाग यांनी आग आटोक्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.