घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ
रत्नागिरी:- मूल होत नसल्याच्या कारणातून जादूटोणाच्या माध्यमातून रत्नागिरीतील एका पाच वर्षीय मुलीचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना गोवा कसलये तिस्क फोंडा येथे घडली. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमेरा अन्वारी असे त्या चिमुरडीचे नाव आहे.
घटना अशी की, कसल्ये येथील एका महिलेचा रत्नागिरीतील एका तरुनासोबत विवाह झाला होता. तिला दोन मुले आहेत. मात्र रत्नागिरीत पती मारहाण करत असल्यामुळे ती आपल्या मुलांना घेऊन फोंडा येथे 2024 साली राहायला गेली. तिथे अन्वारी यांच्या शेजारी अलाट हे परप्रांतीय कुटुंब राहत होते. त्यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते. पप्पू आणि पूजा अशी त्या पती पत्नीची नाव आहेत. मुलबाळ नसल्यामुळे त्यांना निराश आले होते. घरात सुबत्ता नांदावी आणि मुलं व्हावं यासाठी एका मांत्रिकाकडे गेली होती. त्याने नरबळी देण्यास सांगितले.
दरम्यान त्यांच्या शेजारी अमेरा अन्वारी रहात असल्याने आणि त्यांच्या घरच्यांशी चांगले संबंध असल्याने अमेराचा बळी देण्याचे दोघांनी ठरवले. इकडे बुधवार 3 मार्च रोजी अमेरा बेपत्ता असल्याची खबर तिच्या आईने फोंडा पोलिसात दिली. पोलीस तिचा शोध घेत होते. शेजाऱ्यांची ही चौकशी केली. यावेळी पप्पू गोंधळलेला दिसला. पोलिसांनी गुरुवारी त्याची पुन्हा चौकशी केली. तेव्हा मात्र त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरून अमेराचा नरबळी देऊन आपल्या घराशेजारीच तिचा मृतदेह गाडला. पोलिसांनी दोघानाही ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.