दापोली : तालुक्यातील कोंढे येथून सुमारे साडेचार हजार रूपयांचे अंदाजे पन्नास लीटर डिझेल चोरी झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे नोंदविण्यात आली आहे.
चार मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताची दापोली कोंढे ही एसटी बस कोंढे येथे रात्री नऊ वाजून चाळीस मि.पोहचली.सदर बस ही कोंढे येथे वसतीला असते.दिनांक पाच मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता कोंढे येथे उभ्या असलेल्या बसच्या डिझेल टाकीचे कुलूप उघडे असल्याचे चालक आशिष मळेकर यांच्या लक्षात आले.त्यामुळे शहानिशा करून पन्नास लीटर डिझेल हे टाकीचे झाकण उघडून चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस हवालदार पवार करित आहेत.