रत्नागिरी ः कोकण कृषी विद्यापीठ आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात रविवारी (ता.९) सकाळी दहा ते दीड या वेळेत काजू लागवड उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यासाठी अतुल काळसेकर, केदार साठे उपस्थित राहणार आहेत. काजू उत्पादन खर्च, बोंडावर प्रक्रियेतून विद्यापीठाचे संशोधन मूल्यवर्धन यावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कोकणातील काजू उत्पादन प्रक्रिया सद्यस्थिती आणि संधी मूल्यवर्धन या विषयावर राज्य कृषी पणन मंडळाचे मिलिंद जोशी तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. सहकारी तत्त्वावर काजू क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणाऱ्या संधी, रिव्होल्विंग, ब्रॅंडिग, ग्राहकांचे प्रबोधन आदींवर विवेक अत्रे, जयवंत विचारे, धनंजय यादव, अमित आवटी मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्राला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.