लांजा:-कोकण रेल्वे मार्गावर लांजा विलवडे रेल्वे स्टेशनवर जनशताब्दी, मांडवी, नेत्रावती एक्सप्रेसना थांबा मिळण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांना ४ मार्च रोजी विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेचेवतीने माजी खासदार विनायकराव व मा. आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या समवेत विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष श्री . संतोष कदम (व्हेळ) व सरचिटणीस राज हांदे (रिंगणे) इतर पदाधिकारी यांनी शिवसेना भवन येथे जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग माजी खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांची भेट घेतली.
विलवडे रेल्वे स्टेशन संदर्भात जनशताब्दी, मांडवी, नेत्रावती या एक्सप्रेस ना थांबा मिळण्याबाबत व इतर सर्व सुविधा बाबत तालुक्यातील लांजा राजापूर 65 ते 70 गावामधून मागणी होत असल्याने समक्ष सांगितले. तसेच कोंकण रेल्वे मार्फत नियम पुढे करून थांबा मिळण्याबाबत टाळ टाळ करत असल्याचे सांगितले. तरी मा. खासदार विनायक जी राऊत साहेब यांनी रेल्वे मंत्री यांचे कडे पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले आहे.