चिपळूण (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या साजिद सरगुरोह आणि शाहीद सरगुरोह या दोघांना नुकताच उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परशुराम घाटातील मारहाण प्रकरणी साजिद सरगुरोह आणि शाहिद सरगुरोह यांच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अॅडव्होकेट कौन्सिलर संजीव कदम यांच्यामार्फत या दोघांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अनुषंगाने न्यायाधीश राजेश पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील यांनी फिर्यादीच्यावतीने बाजू मांडताना ३५२,३५१(३) या कलमान्वये अटकपूर्व जामीन अर्ज असून साजिद सरगुरोह व शाहिद सरगुरोह यांना जामीन मिळू नये असा युक्तिवाद केला. तर यावर अॅडव्होकेट कौन्सिलर संजीव कदम यांनी साजिद सरगुरोह आणि शहीद सरगुरोह यांच्या बाजूने प्रखरपणे बाजू मांडताना साजिद व शाहिद या दोघांविरोधात कट रचण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून दिले. या युक्तिवादानंतर साजिद व शाहिद सरगुरोह यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.