रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील प्रौढाचा मंगळवारी दुपारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
हरिश्चंद्र भगवान आंबेरकर (४८, रा. तुळसुंदे, राजापूर), असे प्रौढाचे नाव आहे. ते २४ फेब्रुवारी रोजी घरी असताना त्यांना चक्कर आली आणि ते पडले होते. त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी चर्मालय येथील नगर परिषद दवाखान्यात दाखल केले. नंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.