सिंधुदुर्ग:-सावंतवाडी तालुक्यात दाभिल येथील जंगलमय परिसरात असलेल्या पांडवकालीन विहिरीमध्ये पट्टेरी वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. दरम्यान या घटनेमुळे त्या ठिकाणी पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करून वाघाचा मृतदेह जाळुन नष्ट करण्यात आला आहे.
भक्षाच्या शोधात पाठलाग करीत असताना ही घटना घडली असावी असा वनअधिका-यांचा प्राथमिक अंदाज आहे घटना घडल्याची माहिती मिळतात त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.