मुंबई:- राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
राज्याचे अर्थमंत्री लवकरच त्यासाठी आवश्यक तरतूद करून घोषणा करतील, असेही त्यांनी सांगितले.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरात त्यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाद्वारे लक्ष्मणभाऊंना योग्य श्रद्धांजली वाहण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदनावर दोन दिवस झालेल्या या शिबिराचा लाभ १ लाख २१ हजार ५२३ जणांनी घेतला.
अटल महाआरोग्य शिबिरास राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार उमा खापरे, , माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे तसेच शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, राजेंद्र राजापुरे, शशिकांत कदम, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, बाबा त्रिभुवन, चेतन भुजबळ, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, आरती चोंधे, उषा मुंडे, निर्मला कुटे, योगिता नागरगोजे, महेश जगताप, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, काळूराम नढे, शेखर चिंचवडे, संतोष ढोरे, माऊली जगताप, सविता खुळे, नरेश खुळे, डॉ. नागनाथ यंपल्ले, डॉ. अनिल संतपुरे, डॉ. अनिल बिऱ्हाडे, डॉ. धृती दीपा पोतदार, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. सिमरन थोरात, डॉ. रोशन मराठे, डॉ. ननवरे, गणेश बँकेचे संचालक अभय नरडवेकर, कविता दळवी, पल्लवी मारकड आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी आमदार शंकर जगताप यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व अधोरेखित केले होते, याचाही आबिटकर यांनी उल्लेख केला.