रत्नागिरी:-जायंटस वेलफेअर फाउंडेशन, फेडरेशन २ड च्या सन २०२५ सालच्या अध्यक्षपदी गजानन गिड्ये यांची नियुक्ती जायंटस विश्व अध्यक्षा शायना. एन.सी यांनी केली आहे.
सन २०२५ सालच्या फेडरेशन अध्यक्ष आणि त्यांचे सर्व १६ कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा येथील पाटीदार भवनात झाला. समारंभाला जायंट्सचे केंद्रीय समिती सदस्य डॉ.सतीश बापट आणि अॅड. विलासराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष समिती सदस्य, डॉ.मिलिंद सावंत, संजय पाटणकर, माजी अध्यक्ष विनायक राऊत, भूषण मुळ्ये यांच्या उपस्थितीत शपथविधी सभारंभ झाला.
कार्यक्रमात निवेंडी प्राइड या नूतन ग्रुपच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना शपथ देण्यात आली. रत्नागिरीमधील सहा ग्रुप्स चे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्य यांनादेखील शपथ देण्यात आली. गेल्या वर्षी उत्कृष्ट सामाजिक काम केलेले तीन ग्रुप, रत्नागिरी, रत्नागिरी सिटी सहेली आणि कुवारबाव सहेली यांना रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन फेडरेशन उपाध्यक्षा सौ. माधुरी कांबळे यांनी केले.