पहिल्याच दिवशी शाकिरा अडरेकर ठरल्या पैठणीच्या मानकरी
चिपळूण (प्रतिनिधी):- शहरातील जिव्हाळा मार्टतर्फे जागतिक महिला दिन ८ मार्च दिनानिमित्त १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत दररोज सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंत ९९९ च्या खरेदीवर एक कुपन आणि दररोज मिळवा १ पैठणी आणि ८ मार्च ला ५ पैठणी सोडत तसेच रमझान दिना निमित्त विविध वस्तूवर विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून शनिवारी दिनांक १ मार्च रोजी पहिली पैठणी सोडत काढण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील जिव्हाळा मार्टतर्फे ग्राहकांसाठी सणानिमित्त खरेदीवर विशेष ऑफर दिल्या जातात. तसेच उत्तम दर्जाचा किराणा माल असतो. यातून गेल्या काही वर्षांत जिव्हाळा मार्टने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तर दरवर्षी जागतिक महिला दिन व रमजान महिन्यात विशेष योजना सुरू केली जाते.
यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त जागतिक महिला
दिन ८ मार्च दिनानिमित्त १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत दररोज सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंत ९९९ च्या खरेदीवर एका कुपनाच्या आधारे लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी जिंकण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची पहिलीच मानकरी शाकिरा अडरेकर (रा. काविळतळी) या ठरल्या आहेत. तर श्रीमती सुजाता शेलार यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. या योजनेंतर्गत ग्राहकांना खरेदीवर दररोज १ पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. तर ८ मार्च रोजी ५ पैठणी सोडत असणार आहे. तसेच रमझान दिना निमित्त विविध वस्तूवर विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे, अशी माहिती संतोष पेढांबकर यांनी दिली.